vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पहलगाम दहशतवादी हल्ला-राज्यातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाखांची मदत वितरीत..

पहलगाम दहशतवादी हल्ला-राज्यातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाखांची मदत वितरीत..

मुंबई, प्रतिनिधी- जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हल्ल्यात मृत्यू झालेल्या सहा नागरिकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाखांची आर्थिक मदत वितरित करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत झालेल्या राज्यातील नागरिकांच्या कुटुंबियांना सुरवातीस 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. मात्र, नंतर झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही मदत रक्कम वाढवून प्रत्येकी 50 लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार मदत व पुनर्वसन विभागाने मृतांच्या कुटुंबियांना ही आर्थिक मदत वितरित केली.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पीडित कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारकडून मिळालेली ही मदत ही अशा कठीण काळात कुटुंबीयांना थोडा आधार देणारी आहे, अशी भावनाही मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी व्यक्त केली.

000000

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिका  पाणी बचतीबाबतचे नियोजन• नागरिकांमध्ये विविध माध्यंमाद्वारे पाणी बचतीवाचत आवाहन करण्यात येत आहे.

मुंबईत 27 व 28 मार्च रोजी वैद्यकीय परिषद ‘पल्स’ चे आयोजन’पल्स’ परिषदेच्या माध्यमातून वैद्यकीय वेलनेस पर्यटनाचा ‘महाराष्ट्र ब्रँड’ निर्माण करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

लंडनच्या लेडी मेयर डेम ससून लँगली यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट उत्पादन क्षेत्रासोबतच ‘एज्युसिटी’ आणि ‘मेडीसिटी’ सारख्या संकल्पनांमधील संधींवर विशेष भर देण्यात येणार; मुंबई–लंडन सहकार्याला चालना

नवी मुंबई महानगरपालिका चषक पर्यावरणपूरक व प्लास्टीकमुक्त सार्वजनिक श्रीगणेश दर्शन स्पर्धा 2025-26 चे आयोजन

 आताची मोठी बातमी – मुंबईकरांसाठी म्हाडा घरांच्या विक्रीसाठीची ऑनलाइन नोंदणी पुढे ढकलली!  

vishwatmaklokswamivarta

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी बिहार व्होटर व्हेरिफिकेशनवरून इंडिया आघाडीचा एल्गार; संसदेच्या प्रांगणात यादीची चिरफाड करत केराची टोपली दाखवली..

vishwatmaklokswamivarta