vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

पर्यावरणाच्या हानीने मनुष्य जीवाला धोका

पर्यावरणाच्या हानीने मनुष्य जीवाला धोका

 

मुंबई प्रतिनिधी-   मुंबई- नवजात शिशूचे संगोपन प्रत्येक आई वडिल जीवापलीकडे करतात तसेच संगोपन प्रत्येक झाडाच्या रोपट्याचं झाल पाहिजे. झाड जगली तर मनुष्य जगेल, पाणी वाचेल तर मनुष्य वाचेल, उर्जाची बचत केली तर मनुष्य वाचेल अर्थात पर्यावरणाचं रक्षण केले पाहिजे तरच मनुष्य जीव वाचेल अन्यथा झाडांची हत्या करून त्या जागेवर मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या तर मनुष्य जीवन धोक्यात आले आहे. आणि ही समस्या आपल्या देशासह जगाची झाली आहे अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. आणि म्हणूनच नवजात शिशूचे संगोपन आईवडिल करतात तसेच संगोपन झाडांच्या रोपट्याचं झाल पाहिजे असा आगळावेगळा उपक्रम राबवित असताना इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंटचे संयोजक के.रवि दादा यांनी सांगितले. हा उपक्रम जे .जे. वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, हॉस्पीटल मोहम्मद अली रोड, नागपाडा येथे राबविण्यात आला. त्यावेळी नवजात शिशूचे आणि पालकांचे स्वागत करून एक झाड, टॉवेल, टोपी आणि मिठाई इत्यादीखाऊचे बाळाचे किट आणि पालकांसह बाळांना देण्यात आले.   यावेळी इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंटचे संयोजक के रवि दादा, मंत्रालय सहसचिव अशोक आत्राम,अभिनेते अली खान, कमल खान, राज्याचे माजी सहसचिव प्रीतम आठवले, समाजसेविका संगीता भाटिया, परब आदी मान्यवर उपस्थितीत होते. यापुढे बोलताना के. रवि दादा म्हणाले की, अनेक ठिकाणी निसर्गाची मोठे प्रमाणात हानी केली जात आहे मुंबईसारख्या शहरात झाडांची कत्तल करून मोठमोठ्या इमारती उभ्या केल्या जात आहेत. शहराच्या विकासासोबत निसर्गाच्या होणाऱ्या हानीचाही विचार केला पाहिजे. अन्यथा भविष्यात त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. त्यासाठी निसर्गाचा विध्वंस थांबवणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे.

संबंधित पोस्ट

वाशिम वैद्यकीय महाविद्यालयाचे ‘संत सेवालाल महाराज’ नामकरण

विलंबित पुनर्विकासात भाडे बंधनकारक करणारा कायदा आणण्यास शासन सकारात्मक- उद्योग मंत्री उदय सामंत

मुंबई येथे डिझेल, पेट्रोल व पेट्रोलियमसदृश द्रव पदार्थाची अनधिकृत साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई

vishwatmaklokswamivarta

रेल्वे तिकिटाचे आरक्षण – तत्काळ तिकीटासाठी-मोठा बदल ओटीपी अनिवार्य-दलाल मुक्त करण्यासाठी एक निर्णायक पाऊल..

vishwatmaklokswamivarta

राज्य परिवहन महामंडळ बुलढाणा विभागाचा उपक्रम-विविध पॅकेज टुर्सचे आयोजन:प्रवाशांनी लाभ घ्यावा..

पी.आर. जॅग्वार्सने पटकावला टीडब्ल्यूपीएल चषक-खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण