vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईत कबुतरखाना बंदी कायम – सर्वोच्च न्यायालय

मुंबईत कबुतरखाना बंदी कायम – सर्वोच्च न्यायालय

राज्य प्रतिनिधी-

दादर येथील कबुतरखाना बंद करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी कबुतरांना अन्न व पाणी देण्यास बंदी घालण्याचे आणि याचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा नोंदविण्याचे निर्देश दिले होते.

या आदेशाविरोधात संबंधितांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार देत, सध्याच्या घडीला उच्च न्यायालयाचा आदेश लागू राहील असे स्पष्ट केले. तसेच, प्रकरण अद्याप उच्च न्यायालयाच्या विचाराधीन असल्यामुळे यामध्ये हस्तक्षेप करण्याचे कारण नसल्याचे मत व्यक्त केले

सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सल्ला देताना सांगितले की, जर काही आक्षेप असतील तर ते उच्च न्यायालयासमोर मांडावेत. सर्वोच्च न्यायालय हे समानांतर प्रक्रियेप्रमाणे कार्य करू इच्छित नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे प्रकरणाचा अंतिम निर्णय मुंबई उच्च न्यायालयातच होणार आहे.

मुंबईतील कबुतरखान्यामुळे परिसरात होणारे प्रदूषण, स्वच्छतेच्या अडचणी आणि नागरिकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम याबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने हा कठोर आदेश जारी केला होता.

या निर्णयामुळे कबुतरखाना बंदीचा आदेश कायम राहणार असून, पुढील सुनावणी आणि अंतिम निर्णय उच्च न्यायालय घेणार आहे. दरम्यान, स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी या आदेशाचे स्वागत करत, सार्वजनिक आरोग्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे.

संबंधित पोस्ट

श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याची तातडीने अंमलबजावणी करावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसरु. 288.17 कोटींच्या श्री क्षेत्र भिमांशकर विकास आराखड्यास मान्यता

महाराष्ट्र राज्य जिल्ह्याचे पालकमंत्री जाहीर..

vishwatmaklokswamivarta

खटाव याथील मुलींच्या शासाकीय वसतिगृहात प्रवेशप्रक्रिया सुरु*

सुरक्षित शहरांसाठी सीसीटीव्हीचे प्रभावी सुरक्षा कवच निर्माण करण्यात यावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस • सीसीटीव्ही यंत्रणेच्या सनियंत्रणासाठी महामंडळाची निर्मिती करा• माहिती व तंत्रज्ञान विभागाची आढावा बैठक

आरोग्य यंत्रणेच्या बळकटीसाठी निधीचे योग्य नियोजन करा – राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर आरोग्य भवन येथे आढावा बैठक

स्वामित्व योजनेमुळे नागरिकांना दिलासा; मिळकतीचे आपसातील वाद संपुष्टात येतील – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

vishwatmaklokswamivarta