vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिम

जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिम

        सांगली, प्रतिनिधी : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत दिनांक 17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोंबर 2025 या कालावधीत इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील/डिप्लोमा तृत्तीय वर्षातील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव मेघराज भाते यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

   सन २०२६-२७ या चालू शैक्षणिक वर्षात इ.१२ वी विज्ञान शाखेमध्ये व पदवीका तृतीय वर्षात शिकत असलेल्या अनु. जाती., विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग व सा.शै.मा.प्र. (मराठा) (SC, VJ, NT, OBC, SBC, SEBC) या संवर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी विहीत नमुन्यातील जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज त्यांच्या शैक्षणिक संस्थेच्या शिफारशीसह दि. ३१ जानेवारी २०२६ पर्यंत समिती कार्यालयाकडे सादर करावेत.

  अर्जदारांनी https://ccvis.barti.in या संकेतस्थळावर विहीत नमुन्यातील ऑनलाईन अर्ज भरावा. महाविद्यालयीन शिफारसपत्र, १५ A फॉर्मवर प्राचार्यांची सही, शिक्का व चालू वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, जातीविषयक सर्व पुरावे व विहीत नमुन्यातील शपथपत्रासह सर्व मूळ कागदपत्र ऑनलाईन अपलोड करावे व ऑनलाईन भरलेल्या अर्जाची हार्डकॉपी कागदपत्रांच्या / पुराव्यांच्या साक्षांकित प्रतीसह समितीकडे सादर करावे. अर्ज सादर करतेवेळी अर्जदार/ पालक यांनी समक्ष मूळ कागदपत्रांसह उपस्थित रहावे. तसेच २०२५-२६ वर्षातील व्यावसायिक अभ्यासक्रम राखीव प्रवर्गावरील प्रवेश प्रक्रियेतील ज्या विद्यार्थ्यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे पडताळणीसाठी अर्ज केलेले आहेत. तथापि, छाननीनंतर ज्या प्रकरणांमध्ये कागदपत्रांच्या त्रुटी आहेत अशा अर्जदारांना ऑनलाईन प्रणालीतून त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल वर त्रुटी कळविलेली आहे. अशा सर्व अर्जदारांनी त्रुटी पूर्ततकेकरीता अद्याप समिती कार्यालयास संपर्क साधला नसल्यास, दि.१७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर, २०२५ या कालावधीत सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० या वेळेत समिती कार्यालयात मूळ कागदपत्रांसह समक्ष उपस्थित रहावे, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर ‘आयटीआयच्या’ हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे प्रत्येक नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन आणि बचावाचे धडे घेतले पाहिजेत-कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा आयटीआय मध्ये नव्या सहा अभ्यासक्रमाचीही केली घोषणा

प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण टप्पा २ अंतर्गत २० लक्ष घरकुल लाभार्थ्यांना मंजूरी पत्राचे वितरण आणि १० लक्ष घरकुल लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे वितरण  -माजी मंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे

vishwatmaklokswamivarta

यंत्रमाग उद्योगांना वीज सवलत योजनेच्या लाभासाठीवस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या पोर्टलवर नोंदणी अनिवार्य..

गडचिरोली पोलिसांची अवैध कोंबडा झुंज आणि जुगाराविरुद्ध मोठी कारवाई

vishwatmaklokswamivarta

स्वच्छ सर्वेक्षण 2024’मध्ये आता स्वच्छ शहरांच्या नियमित क्रमवारीपेक्षा उच्च स्थानावर ‘सुपर स्वच्छ नवी मुंबई’**10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहरात ‘सुपर स्वच्छ लीग’ मध्ये समाविष्ट महाराष्ट्रातील एकमेव शहर**महामहिम राष्ट्रपती श्रीम.द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते स्विकारला सन्मान**यशाचे श्रेय सातत्य राखणा-या स्वच्छतामित्र, स्वच्छतासखी आणि सर्व नागरिकांचे*

vishwatmaklokswamivarta

मुंबई महानगर क्षेत्रात काळी-पिवळी टॅक्सी व ऑटोरिक्षांच्या भाडेदरात वाढ सुधारित दर 1 सप्टेंबरपासून लागू…