vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 सांगली, प्रतिनिधी) : अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील इयत्ता 11वी, 12 वी तसेच इयत्ता 12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या विदयार्थ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकरीता शैक्षणिक वर्ष सन 2025-26 करीता https://hmas.mahait.org किंवा mahait या ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीतील व हद्दीपासुन 05 कि.मी. परीसरातील तसेच सांगली जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या महाविद्यालयांमधील इयत्ता 11 वी, 12 वी तसेच इयत्ता 12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे म्हणून जिल्हास्तरावरील प्रति विद्यार्थी रक्कम रु. 43,000/- व तालुकास्तरावरील प्रति विद्यार्थी रक्कम रु. 38,000/- इतकी रक्कम तसेच वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष रक्कम रु. 5,000/- व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष रु. 2,000/- इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात येते.

 अधिक माहीतीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सांगली कार्यालय, सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड, सांगली व तालुक्यातील मुला-मुलींच्या सर्व वसतीगृहामध्ये संपर्क साधावा, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हाडा अंतर्गत कर्मचाऱ्यांना यावर्षी दिवाळीत पंचवीस हजार रुपये बोनस मिळणार..

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची पोलिस पाटील भरती परीक्षा केंद्रास भेट• 24 परिक्षा केंद्रावर 7843 परिक्षार्थींनी दिली पोलिस पाटील भरतीची परीक्षा..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्य परिवहन एसटी महामंडळ पुन्हा एकदा मोठ्या आर्थिक संकटात – प्रतिदिन सहा कोटींची तूट

vishwatmaklokswamivarta

🇮🇳 देशात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध — अफवांवर विश्वास ठेवू नका!

राज्य रोजगार मेळाव्यात नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत 6 उमेदवारांना अनुकंपा नियुक्ती..

पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात बोट उलटून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त पंतप्रधानांनी केली मदतीची घोषणा

vishwatmaklokswamivarta