vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अनुसूचित जाती व भटक्या जमाती उमेदवारांसाठी राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती;ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

अनुसूचित जाती व भटक्या जमाती उमेदवारांसाठी राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती;ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

        बुलडाणा, प्रतिनिधी : केंद्र सरकार पुरस्कृत राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती योजना सन 2025-26 करीता अनुसूचित जाती, विमुक्त भटक्या आणि अर्ध-भटक्या जमाती, भूमिहीन शेतमजूर आणि पारंपारिक कारागीर श्रेणीतील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय परदेश शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन सहायक आयुक्त मनोज मेरत यांनी केले आहे.
परदेशात शिक्षण घेऊन पदव्युत्तर पदवी किंवा पीएच.डी. अभ्यासक्रमांचे उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. ज्यामुळे त्यांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती सुधारते. या योजनेअंतर्गत दरवर्षी एकूण 125 जागा दिल्या जातात, त्यापैकी 115 जागा अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी, 6 जागा विमुक्त, भटक्या आणि अर्ध-भटक्या जमातींसाठी आणि 4 जागा भूमिहीन शेतमजूर आणि पारंपारिक कारागीर उमेदवारांसाठी राखीव आहेत. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी https://nosmsje.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा.
       पात्रता : अनुसूचित जाती, विमुक्त, भटक्या आणि अर्ध-भटक्या जमाती, भूमिहीन शेतमजूर आणि पारंपारिक कारागीर उमेदवार असावा. भारताचा रहिवासी असावा, वयोमर्यादा 35 वर्ष, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त नसावे. पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी पदवी परिक्षेत व पीएचडी अभ्यासक्रमासाठी पदव्युत्तर परिक्षेत किमान 60 टक्के गुण असणे आवश्यक. परदेशातील शिक्षण संस्था ही जागतिक क्रमवारीत 500 आत असावी

संबंधित पोस्ट

बुलढाणा जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढला; कमाल तापमानाचा पारा ४३.६ अंशांवरविदर्भात अमरावती आणि वर्धा सर्वाधिक उष्ण; नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्ध परिस्थितीमुळे तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विविध नागरिकांच्या संपर्कात राज्य सरकार आहे-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोळसा वाहतुकीमुळे पिकांची होणारी नुकसानभरपाई ठरवण्यासाठी समिती गठीत-मंत्री शंभूराज देसाई

टॅक्सी, ऑटो रिक्षा प्रवासी वाहनांची वयोमर्यादा निश्चित

शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवडयादी प्रसिद्ध

शांतीक्षेत्र प्रेमगिरी आश्रमात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा; केंद्रीय मंत्री श्री. गजेंद्र सिंह शेखावत यांची प्रमुख उपस्थिती*