vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीस्थानिक बातम्या

क्रीडा व युवक कल्याण विभागामार्फत6, 7 डिसेंबरला ग्लोबल युथ फेस्टिव्हल 2025

क्रीडा व युवक कल्याण विभागामार्फत6, 7 डिसेंबरला ग्लोबल युथ फेस्टिव्हल 2025

मुंबई, प्रतिनिधी : शहरातील तरूणांसाठी 6 आणि 7 डिसेंबर रोजी जिओ वर्ल्ड गार्डन, वांद्रे येथे क्रीडा व युवक कल्याण विभागामार्फत श्रीमद राजचंद्र मिशन यांच्या सहकार्याने ग्लोबल युथ फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. यामध्ये १०,००० पेक्षा जास्त तरुण मन:शांती, अॅडव्हेंचर, आर्ट्स, कल्चर, संगीत, योग-ध्यान, समाजाभिमुख उपक्रम आणि (स्किल-बिल्डिंग) कौशल्य विकास यांसारख्या अनोख्या उपक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.

क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या सहकार्याने, हा देशातील आघाडीचा युवक उत्सव ठरणार आहे. आत्मपरिवर्तनातून समाजपरिवर्तन घडवण्यासाठी हा उत्सव तरुणांची चळवळ म्हणून उभी राहील.

लंडन आणि पुण्यासारख्या शहरानंतर ग्लोबल यूथ फेस्टिव्हल या वर्षी मुंबई येथे आयोजित करण्यात येत आहे. ग्लोबल यूथ कम्युनिटी ही २० पेक्षा जास्त देशांमध्ये आणि 170 पेक्षा जास्त शहरांमध्ये पसरलेली तरुणांची एक प्रेरणादायी चळवळ आहे. क्रिएटर्स, व्यावसायिक, कलाकार, उद्योजक आणि चेंजमेकर यांनी एकत्रित येऊन ग्लोबल यूथ कमिटी तयार केली आहे.

हजारो लोकांना एकत्र आणणारे सायकलथॉनसारखे उपक्रम, ग्रामीण विकासासाठी केलेले अनेक प्रकल्प, आरोग्य, प्राणी-कल्याण, शिक्षण यांसाठी उभारलेले उपक्रम यामुळे हा उत्सव केवळ मनोरंजन नसून प्रभाव आणि परिवर्तनाचा उत्सव ठरणार आहे.संगीत किंवा कला अशा एखाद्या विषयापुरते मर्यादित न राहता, ग्लोबल युथ फेस्टिवल हा समग्र अनुभव देणारा उत्सव आहे. महिला सक्षमीकरण, बालशिक्षण, ग्रामीण विकास, प्राणी-कल्याण, पर्यावरण संवर्धन यांसारख्या समाजोपयोगी उपक्रमांचे प्रात्यक्षिक देशातील सर्वात मोठा आऊटडोअर साउंड हीलिंग अनुभव, संगीत, कला, ध्यान, जर्नलिंग, पॉटरी, ड्रम सर्कल अशा मजेशीर पॉप-अप अ‍ॅक्टिव्हिटीज यांचा समावेश असणार आहे. अधिक माहितीसाठी youthfestival.srmd.org येथे भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

००००

 

श्रद्धा मेश्राम/विसंअ

संबंधित पोस्ट

फुलांची होळी – पर्यावरणपूरक सण साजरी- 🌸 मुंबईचे महापौर श्रीमती रितू तावडे

कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत प्रक्रिया युनिट करीता अर्ज सादर करावेत

वाद्यरंग’ सांस्कृतिक कार्यक्रमातून सांस्कृतिक कार्य विभागाचा वाद्यजागर; ७५ पेक्षा जास्त दुर्मिळ व पारंपरिक वाद्याचे प्रदर्शन ‘स्वराज्य की शपथ’ टपाल तिकीटाचे व महात्मा गांधी संकलित वाङ्मय- भाग २ चे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस -पार्टी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र अजित दादा पवार साहब व मा. कैबेनेट मंत्री आदरणीय नेता नवाब मालिक साहब व युवा आमदार मा. सौ. सनामालिक शेख साहिबा व मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ टी कांबले साहब यांच्या मार्गदर्शनाखाली धारावी विभागातून सभासद नोंदणी अभियान…

सिडकोच्या अखत्यारीतील ३ स्थानके मध्य रेल्वेकडे हस्तांतरित,तरघर, खारकोपर आणि बामनडोंगरी स्थानके मध्य रेल्वेच्या ताब्यात नवी मुंबईकर रेल्वे प्रवाशांचा प्रवास होणार सुखकर  खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला यश…

नव्या मुंबईत स्वच्छ सर्वेक्षणाला सामोरे जाताना स्वच्छता अधिकारी, कर्मचारी यांची क्षमतावृध्दी कार्यशाळा उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta