vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशराजकारणस्थानिक बातम्या

माजी आमदार अँड त्र्यंबकनाना भिसे यांचा मुख्यमंत्री मा देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश

माजी आमदार अँड त्र्यंबकनाना भिसे यांचा मुख्यमंत्री मा देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश

     राज्य प्रतिनिधी- लातूर ग्रामीणचे काँग्रेसचे माजी आमदार अँड त्र्यंबकनाना भिसे यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माजी मंत्री भगवंत खुबा यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला या प्रवेशाने लातूर ग्रामीण मतदार संघातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीचे चिञ बदलणार असून हा काॅग्रेस पक्षाला मोठा झटका आहे.

          काँग्रेस नेतृत्वाच्या एकाधिकार आणि हुकूमशाही कारभारामुळे गेली अनेक दिवसापासून अस्वस्थ असलेले लातूर ग्रामीण मतदार संघातील काँग्रेसचे माजी आमदार अँड त्र्यंबकनाना भिसे यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देत गुरुवारी उदगीर येथील भाजपा महायुतीच्या प्रचार जाहीर सभेत राज्याचे मुख्यमंत्री मा देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माजी मंत्री भगवंत खुबा साहेब यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी जाहीर प्रवेश केला यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष माजी मंत्री बसवराज पाटील, माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, लातूर ग्रामीणचे आमदार श्री रमेशआप्पा कराड, औसा विधानसभेचे आमदार श्री अभिमन्यू पवार, माजी मंत्री उदगीरचे आमदार श्री संजय बनसोडे, माजी आमदार ज्येष्ठ नेते गोविंदांना केंद्रे, भाजपाच्या नेत्या डॉ अर्चनाताई पाटील चाकूरकर, गणेश दादा हाके यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

        आगामी काळात होणाऱ्या रेणापूर नगरपंचायतीसह जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर अँड त्रिंबकनाना भिसे यांचा भारतीय जनता पार्टी प्रवेश झाल्याने लातूर ग्रामीण मतदार संघातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित प्रभात फेरीस उत्स्फूर्त प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक-2026 99.78 टक्के मतदान, आठ पैकी सात केंद्रावर शंभर टक्के मतदान

ज्ञानसंपादनासाठी विद्यार्थ्यांनी वाचनकक्षा रुंदावणे गरजेचे- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे मुंबई शहर जिल्हा ग्रंथोत्सवाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

शिवराज्याभिषेक सोहळा-2026 करिताजड-अवजड वाहनांकरिता वाहतुक बंदी आदेश जारी..

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त समता दिंडी

सिंचन पाणीपट्टी वाढ अंतिम निर्णय येईपर्यंत स्थगितच राहणार – जलसंपदा मंत्री, राधाकृष्ण विखे पाटील,पाणी पुरवठा सहकारी संस्थांचे रूपांतर पाणी वापर संस्थांमध्ये होणार नाही कालवा सल्लगार समितीच्या बैठकीत कोल्हापूर पाटबंधारे विभागातील चार प्रकल्पांचा आढावा..