vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पासपोर्ट संबंधित समस्या निराकरणासाठी 10 डिसेंबरला संवादसत्र

पासपोर्ट संबंधित समस्या निराकरणासाठी 10 डिसेंबरला संवादसत्र

 सांगली, द प्रतिनिधी: जनतेच्या पासपोर्ट संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी बुधवार, दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पासपोर्ट बिल्डींग, सर्व्हे नंबर 5/2/2 बाणेर-पाषाण लिंक रोड, बाणेर, पुणे येथे दुपारी 3 ते 5 या वेळेत संवादसत्र आयोजित केले असल्याचे क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय पुणे कडून प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

संवाद सत्रादरम्यान, पासपोर्ट अर्जदार त्यांच्या पासपोर्ट अर्ज/तक्रारीशी संबंधित प्रश्नांसाठी प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना भेटू शकतात. फाईल क्रमांक, नवीनतम पासपोर्ट क्रमांक (जर असेल तर), नाव, प्रश्न थोडक्यात या तपशीलांचा आगाऊ उल्लेख करून rpo.pune@mea.gov.in वर पाठवावा. पुणे येथील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाकडून एक पुष्टीकरण ईमेल पाठवला जाईल. हा पुष्टीकरण ईमेल सादर केल्यानंतरच संवाद सत्र मध्ये प्रवेश दिला जाईल. ओपन हाऊससाठी नोंदणी दुपारी 2 वाजता सुरू होईल, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात स्थित पवित्र हेमकुंड साहिबचे दरवाजे उद्या भाविकांसाठी उघडण्यात येणार

vishwatmaklokswamivarta

मराठी भाषा विद्यापीठाच्या पहिल्या परीक्षेस सुरवात..

vishwatmaklokswamivarta

आणीबाणीत लढा देणाऱ्या व्यक्तींचा आज होणार सन्मान जिल्हाधिकारी कार्यालयात गौरवमुर्तींचा सन्मान सोहळा व चित्रप्रदर्शनाचे आयोजन

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग प्राधान्याने पूर्ण करणार- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

दिव्यांग क्षेत्रातील व्यक्ती व संस्थांना आवाहन 

vishwatmaklokswamivarta

७.५ एचपीच्या मर्यादेत वीज वापर आणल्यास शेतकऱ्यांना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा लाभ- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस