vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

सेवाकर्मी पुरस्कार” कार्यक्रमात जिल्हा परिषद ठाणेची उल्लेखनीय कामगिरी महाराष्ट्रातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या कार्यालयांमध्ये स्थान – १०० पैकी ८० गुणांकन…

सेवाकर्मी पुरस्कार” कार्यक्रमात जिल्हा परिषद ठाणेची उल्लेखनीय कामगिरी महाराष्ट्रातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या कार्यालयांमध्ये स्थान – १०० पैकी ८० गुणांकन…

ठाणे, प्रतिनिधी – सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आयोजित “सेवाकर्मी + पुरस्कार” कार्यक्रमांतर्गत राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कार्यालयांचे मूल्यमापन करण्यात आले. या मूल्यांकनात जिल्हा परिषद ठाणे यांनी उल्लेखनीय कामगिरी नोंदवत १०० पैकी ८० गुणांकन मिळवून “सेवाकर्मी पुरस्कार” प्राप्त केला आहे. राज्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदांमध्ये स्थान मिळविणे ही जिल्हा परिषद ठाणेसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

या मूल्यांकनासाठी शासनाच्या विविध निकषांनुसार प्रशासनिक कार्यपद्धती, सेवाविषयक नोंदींचे व्यवस्थापन, कर्मचारी सेवा विषयक पारदर्शकता, वेळेवर नोंदी अद्ययावत ठेवणे, शासकीय सेवा नियमांचे पालन तसेच कार्यालयीन कामकाजातील शिस्त आणि गुणवत्तेचा सखोल आढावा घेण्यात आला.

गट-क व गट-ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सेवा नोंदींचे संगणकीकरण, सेवाज्येष्ठता सूची विहित कालावधीत प्रसिद्ध करणे, भरती व पदोन्नती अंतर्गत विहित निकषानुसार नियुक्ती देणे, iGOT पोर्टल ( कर्मयोगी पोर्टल) वरील प्रशिक्षण पुर्ण करून घेणे तसेच कर्मचारी व्यवस्थापनातील पारदर्शकता या बाबींमध्ये विशेष प्रगती करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचारी सेवा पुस्तिका अद्ययावत ठेवणे, संवर्गनिहाय माहितीचे शिस्तबद्ध संकलन व शासनाच्या निर्देशांचे काटेकोर पालन ही बाब गुणांकनामध्ये महत्त्वाची ठरली.

कार्यालयीन कामकाजातील सुसूत्रता, ई-प्रणालींचा प्रभावी वापर, तसेच कर्मचारी विषयक कामांमध्ये वेग आणि अचूकता राखल्यामुळे जिल्हा परिषद ठाणे यांना उच्च गुणांकन मिळाले आहे. या यशामागे अधिकारी-कर्मचारी यांचे समन्वयित प्रयत्न, प्रशासनातील शिस्तबद्धता आणि सेवा वितरणातील गुणवत्ता कायम ठेवल्याने महत्त्वाची ठरली आहे.

या यशाबद्दल जिल्हा परिषद ठाणे प्रशासनाने सर्व अधिकारी-कर्मचारी यांचे अभिनंदन केले असून, भविष्यातही प्रशासनिक कामकाज अधिक परिणामकारक व पारदर्शक ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.

000

संबंधित पोस्ट

मेट्रो मार्ग ७ अ मधील भुयारी बोगद्याचे ‘ब्रेक थ्रू’ यशस्वीरित्या पूर्ण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

महात्मा ज्योतीबा फुले , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, फातेमा शेख यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा! मॉ सेवाभावी बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेची मागणी..

बदलापूर शहरातील पाणीपुरवठा प्रकल्प महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे;- पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील· नगरविकास विभागाचा शासन निर्णय जारी…

vishwatmaklokswamivarta

उन्हाळी भुईमुग पिकासाठी शंभर टक्के अनुदानावर प्रमाणित बियाणे वितरणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद ठाणेची अधिकृत वेबसाईट नागरिकांसाठी सुलभ व पारदर्शक

vishwatmaklokswamivarta

विधान परिषद प्रश्नोत्तरे :दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत कामांमध्ये अनियमितता प्रकरणी चौकशी नंतर योग्य ती कारवाई – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे