vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा माहिती कार्यालयाचे प्रचार रथ मार्गस्थ; 230 गावांमध्ये पोहोचणार शासनाच्या योजनांची माहिती

जिल्हा माहिती कार्यालयाचे प्रचार रथ मार्गस्थ; 230 गावांमध्ये पोहोचणार शासनाच्या योजनांची माहिती

बुलढाणा प्रतिनिधी : शासनाच्या सामाजिक न्याय तसेच शासनाच्या विविध विभागांच्या लोककल्याणाच्या योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणारे चित्ररथाला आज जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ करण्यात आले. शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा विद्यार्थी व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी यावेळी केले. हे प्रचाररथ बुलढाणा जिल्ह्याच्या 13 तालुक्यातील 230 गावांमध्ये शासनाच्या योजनांची माहिती पोहोचविणार आहेत.

सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती घटकांसाठी तसेच सामान्य योजनेद्वारे जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून जिल्हा माहिती कार्यालयामार्फत हा उपक्रम राबविला जात आहे. यावेळी उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी राहूल पवार, जिल्हा माहिती अधिकारी यासेरोद्दीन काझी, माहिती सहायक सतिश बगमारे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.

सामाजिक न्याय विभागाच्या विशेष घटक योजनेतून विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहे, विविध शिष्यवृती योजना, आंतरजातीय विवाह प्रोत्साहन, शासकीय पुनर्वसन योजना, राजर्षि शाहू गुणवत्ता पुरस्कार, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, आर्थिक सहाय्य योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना, कन्यादान योजना, स्वाधार योजना इ. तसेच जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत कृषी विभाग, महसूल विभाग, जिल्हा कौशल्य विभाग, पुरवठा विभाग अशा विविध विभागाच्या शासनाच्या विविध योजनांची माहिती चित्ररथाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. चित्ररथामध्ये असणाऱ्या एलईडी दृकश्राव्य चित्रफितींच्या माध्यमातून व फ्लेक्स बोर्डांद्वारे माहिती दिली जाणार आहे. हे प्रचाररथ जिल्ह्यातील सर्व तालुक्यात प्रामुख्याने ग्रामीण भागात फिरणार आहे. जिल्ह्यातील 230 गावांमधून हे अभियान राबविले जाणार आहे.

00000

संबंधित पोस्ट

आदि कर्मयोगी अभियानांतर्गत जिल्ह्यातील ११३ गावांच्या विकास आराखड्यांना मंजुरी

मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र सादर करणे बंधनकारक

vishwatmaklokswamivarta

अपघातमुक्त गडचिरोलीसाठी सखोल विश्लेषण व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा : सहपालकमंत्री ॲड आशिष जयस्वाल**विविध विभागांच्या कामकाजाचा मॅरेथॉन आढावा*रस्ते सुरक्षा, ‘गडचिरोली रोड नेटवर्क’, मानव-वन्यजीव संघर्ष आणि आरोग्य मोहिमांवर भर*

ठाण्यात रंगणार ‘गोकुळ दहीहंडी २०२६’गोविंदा पथकांसाठी ५५ लाखांची बक्षिसेउत्सवात `नशामुक्त महाराष्ट्र’ ची होणार जनजागृती…

vishwatmaklokswamivarta

जातीचा दाखला मिळवण्यासाठी विशेष मोहीम..

vishwatmaklokswamivarta

मोफत वीज सवलत व गणेश उत्सव भत्ता योजना लाभासाठी अर्ज मागविले