vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

कोल्हापुरात रंगणार संत ज्ञानेश्वरांच्या जीवनप्रवासाचा सोहळा; ‘मोगरा फुलला’ कार्यक्रमाचे आयोजन

कोल्हापुरात रंगणार संत ज्ञानेश्वरांच्या जीवनप्रवासाचा सोहळा; ‘मोगरा फुलला’ कार्यक्रमाचे आयोजन

कोल्हापूर, प्रतिनिधी : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर विविध सांस्कृतिक उपक्रमांची मांदियाळी सुरू आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून कोल्हापूरच्या रसिकांसाठी ‘मोगरा फुलला’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे

कार्यक्रमाचा तपशील:दिनांक: सोमवार, २७ एप्रिल २०२६वेळ: सायंकाळी ६ वाजता स्थळ: गोविंदराव टेंबे सभागृह, देवळ क्लब, कोल्हापूर.

प्रवेश विनामूल्य,भक्ती आणि संगीताचा सुरेल संगम“ज्ञानीयांचा राजा मोगरा फुलला” हा कार्यक्रम संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अलौकिक जीवनचरित्रावर आधारित आहे. या कार्यक्रमात निरूपणकार गणेश शिंदे माऊलींच्या जीवनातील निवडक आणि प्रेरणादायी प्रसंग आपल्या ओघवत्या भाषेत उलगडून दाखवतील. या निरूपणाला सुप्रसिद्ध गायिका सन्मिता शिंदे यांच्या गायनाची साथ लाभणार असून, अभंग, भजन, गवळण आणि भारूड यांच्या माध्यमातून भक्तीचा मोगरा रसिकांच्या मनात दरवळणार आहे.

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून हा उपक्रम राबविला जात आहे. संत ज्ञानेश्वरांचे विचार आणि त्यांचे कार्य केवळ ग्रंथांपुरते मर्यादित न राहता ते नव्या पिढीपर्यंत, विशेषतः तरुणांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावे, हा या आयोजनामागचा मुख्य उद्देश आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी कोल्हापूर परिसरातील सर्व रसिक श्रोत्यांना आणि भाविकांना या सांगीतिक मेजवानीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तिरसाचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

०००

संबंधित पोस्ट

56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) साठी माध्यम अधिस्वीकृती सुरु एफटीआयआय 18 नोव्हेंबर 2025 रोजी गोव्यातील पणजी येथे एक दिवसाचा चित्रपट रसग्रहण प्रमाणपत्र अभ्यासक्रम आयोजित करणार

vishwatmaklokswamivarta

 97 वा ऑस्कर सोहळा लॉस एंजलिस येथे संपन्न झाला ‘ अनोरा चित्रपटाने जिंकले सर्वाधिक 5 पुरस्कार..

नृत्यांगना गौतमी पाटीलवर मरगळे कुटुंबीयांचा गंभीर आरोप, कारने रिक्षाला धडक दिल्यानंतर चौकशी तर सोडाच पण…

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार

बॉलीवूड अभिनेता सलमान खान याचा ‘सिकंदर’ची अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच मालामाल! 30 मार्च रोजी ‘सिकंदर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला…