vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

बुधवारी हदगाव येथे पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

बुधवारी हदगाव येथे पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

नांदेड प्रतिनिधी :- नांदेड जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व वैराग्यमूर्ती दत्ताबापू शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था हदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार 29 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजेपासून वैराग्यमूर्ती दत्ताबापू शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हदगाव येथे पंडीत दिनदयाळ उपाध्याय प्लेसमेट ड्राईव्ह/ रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित उद्योजक तसेच शाळा व महाविद्यालय तसेच इतर खाजगी आस्थापनांमध्ये रोजगार व नोकरीच्या संधीसाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी बुधवार 29 एप्रिल 2026 रोजी रोजगार मेळाव्यास उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त डॉ.रा.म. कोल्हे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र , आनंदनगर रोड, बाबा नगर नांदेड कार्यालयाचा ई-मेल आयडी nandedrojgar01@gmail.com आणि कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02462-251674 यावर संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

जादूटोणा व अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी -अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ,विज्ञान युगातही अंधश्रद्धेचा विळखा जनतेला फसवल्यास सात वर्षापर्यंत शिक्षा…

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केला ऑन दि स्पॉट तक्रारीचा निपटारा..

सिंधुदुर्ग जिल्ह्याला घाटमाथ्याशी जोडणाऱ्या तळेरे–करूळ घाटात दरड कोसळली; एकेरी वाहतूक सुरूसिंधुदुर्ग जिल्ह्याला घाटमाथ्याशी जोडणाऱ्या तळेरे–करूळ घाटात दरड कोसळली; एकेरी वाहतूक सुरू

vishwatmaklokswamivarta

अहिल्यानगर जिल्हा औद्योगिक विकासाचे केंद्र म्हणून उदयास येणार – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

vishwatmaklokswamivarta

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी: फळबाग लागवडीसाठी शासनाच्या विविध योजना