vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जलसाक्षरतेसाठी लोकचळवळ आवश्यक – पालकमंत्री मकरंद जाधव पाटील• जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचा समारोप

जलसाक्षरतेसाठी लोकचळवळ आवश्यक – पालकमंत्री मकरंद जाधव पाटील• जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचा समारोप

बुलढाणा, प्रतिनिधी : जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आज ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२६’ चा समारोप समारंभ संपन्न झाला. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी विधानसभा आमदार संजय गायकवाड, श्वेता महाले, मनोज कायंदे, सिद्धार्थ खरात, जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे, विभागीय वन अधिकारीजमीर शेख, तसेच जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता श्रीराम हजारे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री मकरंद जाधव पाटील म्हणाले की, जलसाक्षरतेसाठी काढण्यात आलेली ‘गोदावरी-नर्मदा जलदिंडी’ ही केवळ एक यात्रा नसून, ते जलसंधारणाच्या दिशेने पडलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी जलव्यवस्थापनाचा जो वारसा दिला, तोच पुढे नेत सिंचन व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यावर सरकारचा भर आहे. ‘पर ड्रॉप मोअर क्रॉप’ या सूत्राचा अवलंब करून शेतकऱ्यांना जलसाक्षर करणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

या कार्यक्रमादरम्यान जलसंधारण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, महिला बचत गट आणि प्रगतशील शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. जलसंपदा विभाग, वन विभाग आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त समन्वयाने हा पंधरवडा यशस्वीपणे राबविण्यात आला.

000000

संबंधित पोस्ट

बारवाले महाविद्यालयात ‘Flagship Programme’ कार्यशाळा उत्साहात पार पडली

vishwatmaklokswamivarta

सहेली महिला बचत गटाच्या वतीने पेढे वाटून डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

बँकांनी ग्राहकांच्या तक्रारीची गंभीरतेने दखल घ्यावी अन्यथा रिझर्व बँक कारवाईचा बडगा उगारणार, जनजागृती कार्यक्रम आणि बँकिंग तक्रार निवारण कार्यशाळेचे आयोजन

जिल्ह्यातील ५० गावे आणि शंभर अंगणवाड्या स्मार्ट इंटेजिलंट व्हाव्यात – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

भविष्यात ग्रीन स्टील क्षेत्रातही महाराष्ट्र सर्वोत्तम ठरेल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आयफा २०२५ स्टील महाकुंभचे

vishwatmaklokswamivarta

भारतरत्न’ सन्मानित शिल्पांचा, त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन आयुष्यात मोठे व्हा – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

vishwatmaklokswamivarta