vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

एसटी महामंडळातर्फे विद्यार्थ्यांना मिळणार ‘एनसीएमसी’ स्मार्ट कार्ड;आधार संलग्न ‘सरल’ व ‘अपार’ क्रमांक अनिवार्य

एसटी महामंडळातर्फे विद्यार्थ्यांना मिळणार ‘एनसीएमसी’ स्मार्ट कार्ड;आधार संलग्न ‘सरल’ व ‘अपार’ क्रमांक अनिवार्य

 

लातूर, प्रतिनिधी राज्य परिवहन महामंडळातर्फे विविध सामाजिक घटकांना प्रवास भाड्यात देण्यात येणाऱ्या सवलतींसाठी आता आधारकार्ड संलग्न ‘एनसीएमसी अनेब्ल्ड स्मार्ट कार्ड’ वितरीत करण्यात येत आहे. लवकरच शालेय व व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सवलतीच्या पासेसकरिताही या कार्डची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. शासनाच्या ९ ऑक्टोबर २०१८ च्या निर्णयानुसार सवलतधारी प्रवाशांना स्मार्ट कार्ड देण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार राज्य परिवहन महामंडळ, मे. ईबिक्स टेक्नोलॉजिस लि. आणि एनएसडीएल पेमेंट्स बँक यांच्या संयुक्त विद्यमाने हे कार्ड देण्याची कार्यवाही सर्व आगारांमध्ये सुरू आहे. १६ फेब्रुवारी २०२६ पासून अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारी प्रवाशांसाठी कार्ड नोंदणी व वितरण प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, याच धर्तीवर आता नजीकच्या काळात विद्यार्थ्यांनाही हे स्मार्ट कार्ड दिले जाणार आहे.

शालेय, शैक्षणिक, तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ‘सरल’ व ‘अपार’ क्रमांक संलग्न एनसीएमसी कार्ड प्राप्त होणार आहे. यासाठी हे दोन्ही क्रमांक विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाशी जोडलेले असणे अनिवार्य आहे. शालेय विद्यार्थ्यांना मासिक पासाकरिता लागणाऱ्या या स्मार्ट कार्डचा मागणी अर्ज एसटी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे. या अर्जात नमूद केलेली माहिती व जोडलेली आवश्यक कागदपत्रे संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांकडून प्रमाणित करून घेणे आवश्यक असून, त्यानंतरच हा अर्ज आगारातील किंवा बसस्थानकावरील वाहतूक नियंत्रक अथवा अधिकृत एजंट यांच्याकडे जमा करावयाचा आहे. या कार्डच्या नोंदणी प्रक्रियेसाठी विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांचा चालू मोबाईल (भ्रमणध्वनी) क्रमांक देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

अर्जाची तपासणी व पडताळणी झाल्यानंतर आवश्यक शुल्क आकारून विद्यार्थ्यांना पावती दिली जाईल. नोंदणी पूर्ण झालेले हे एनसीएमसी कार्ड ३० दिवसांच्या आत प्रिंट करून संबंधित आगारास प्राप्त होईल आणि त्यानंतर आगारामध्ये पॉस (पीओएस) मशिनद्वारे हे कार्ड ॲक्टिव्ह करून ते प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना वितरित केले जाईल. तरी सर्व संबंधित विद्यार्थी आणि पालकांनी नोंदणी प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांची आगाऊ पूर्तता करून ठेवावी, असे आवाहन लातूर राज्य परिवहन महामंडळाच्या लातूर विभाग नियंत्रकांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

मुक्त शिक्षण प्रणालीमुळे शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना संधी मिळण्यास मदत -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘एज्युकेट गर्ल्स’ संस्थेसोबत शासनाचा सामंजस्य करार

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातून नागरिकांमध्ये शासनाबाबत विश्वासनिर्मिती- कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा· महसूल विभागाचा अभिनव उपक्रम

प्रशासकीय गतिमानता, कार्यक्षमता वृद्धी व ज्ञानसंवर्धनासाठी अमरावती विभागात ‘महा-साधना सप्ताह’- विभागीय आयुक्त नयना गुंडे• विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ‘iGOT कर्मयोगी’ पोर्टलवरील प्रशिक्षण पूर्ण करण्याचे आवाहन

शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी त्वरित पूर्ण करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते लखनौ छावणीतील स्मृतिका युद्ध स्मारक येथे अत्याधुनिक लेझर, लाईट आणि साऊंड शोचे उद्घाटन

रासायनिक दुर्घटनेचे आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक; ३०० जणांचा सहभाग

vishwatmaklokswamivarta