vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा प्रशासनाच्या ‘ई-भूमिती’ प्रकल्पाला प्रतिष्ठित स्कॉच पुरस्कार जिल्हाधिकारी वर्षा मीना यांना पुरस्कार प्रदान

जिल्हा प्रशासनाच्या ‘ई-भूमिती’ प्रकल्पाला प्रतिष्ठित स्कॉच पुरस्कार जिल्हाधिकारी वर्षा मीना यांना पुरस्कार प्रदान

 

नवी दिल्ली, प्रतिनिधी : अकोला जिल्हा प्रशासनाच्या नाविन्यपूर्ण “ई-भूमिती – मॅपिंग एव्हरी इंच ऑफ गव्हर्नन्स” या प्रकल्पाला देशातील प्रतिष्ठित स्कॉच पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथील पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, ऑगस्ट क्रांती मार्ग येथे आयोजित 108 व्या स्कॉच समिटमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा मीना यांनी हा पुरस्कार स्वीकारला.स्कॉच पुरस्कार हा भारतातील प्रशासन, सुशासन, डिजिटल परिवर्तन, सामाजिक विकास, वित्तीय समावेशन आणि सार्वजनिक सेवा क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल घेणारा एक मानाचा राष्ट्रीय पुरस्कार मानला जातो. देशभरातील विविध शासकीय संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि नाविन्यपूर्ण प्रकल्पांमधून उत्कृष्ट उपक्रमांची निवड करून त्यांना हा सन्मान प्रदान केला जातो. त्यामुळे या पुरस्कारामुळे अकोला जिल्ह्याच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे.

ई-भूमिती हा जिल्ह्यातील विविध शासकीय मालमत्ता, सुविधा व सेवांचे भू-स्थानिक जीआयएस तंत्रज्ञानाद्वारे एकत्रित डिजिटल मॅपिंग करणारा अभिनव प्रकल्प आहे. या प्रणालीमध्ये शाळा, अंगणवाडी केंद्रे, रेशन दुकाने, आरोग्य संस्था, जलस्रोत, डिजिटल सेवा केंद्रे, शासकीय कार्यालये तसेच विविध सार्वजनिक सुविधांची अचूक भौगोलिक माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे प्रशासनाला विकासकामांचे नियोजन, संसाधनांचे व्यवस्थापन, सेवा वितरण आणि निर्णय प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबविणे शक्य झाले आहे.

जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित करण्यात आलेल्या या प्रकल्पाने जिल्हा प्रशासनात डेटा-आधारित निर्णय प्रक्रियेला चालना दिली असून पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कार्यक्षमता वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी तसेच नागरिकांना उत्तम सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरत आहे.

या राष्ट्रीय सन्मानाबद्दल जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी प्रकल्पाशी संबंधित सर्व अधिकारी, कर्मचारी आणि तांत्रिक चमूचे अभिनंदन केले असून हा पुरस्कार संपूर्ण अकोला जिल्ह्याच्या सामूहिक प्रयत्नांचा गौरव असल्याचे सांगितले.

संबंधित पोस्ट

मराठा समाजाचे नेते श्री. मनोज जरांगे पाटील यांना उपोषण स्थगित करण्याची विनंती!

एपीएमसी मार्केटजवळील चेक पोस्टवर आचारसंहिता पथकाने पकडली 16 लाख 16 हजार रोकड

vishwatmaklokswamivarta

बारामती रेल्वे स्थानकाला आधुनिकतेची नवी ओळख!

राष्ट्रीय महिला आयोगाचा उपक्रम; येत्या ८ मार्चपासून जिल्हा मुख्यालयात विवाहपूर्व समुपदेशन केंद्र कार्यान्वित होणार

vishwatmaklokswamivarta

तलाठी निवडीच्या बनावट आदेशांना बळी पडू नका;जिल्हा प्रशासनाचे आवाहन

मेहकर तालुक्यातील 65 ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण; 16 एप्रिला सोडत