vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईतील ओशिवरा बस डेपोमध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये लागली आग..

मुंबईतील ओशिवरा बस डेपोमध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये लागली आग..

 

मुंबई प्रतिनिधी –

मुंबईतील गोरेगाव आणि जोगेश्वरी दरम्यान ओशिवरा बस डेपोमध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच डेपोतील लोक आजूबाजूला पळू लागले त्यांनी अग्निशामक दलालाही सदर घटनेची माहिती दिली आणि स्वतः डेपोतील बीएसटी बस कर्मचारी आग विझवण्यासाठी प्रयत्न करू लागले, सदर घटनेची माहिती मिळताच बस डेपो  बी एस टी चे वरिष्ठ अधिकारी आणि घटनास्थळी हजर झाले आणि आज वेळ जाण्याचा प्रयत्न अग्निशामक दलातर्फे करण्यात आला अशी माहिती एक्सवरही देण्यात आलेली आहे

प्राप्त माहितीनुसार-मुंबईतील गोरेगाव आणि जोगेश्वरी दरम्यान ओशिवरा बस डेपोमध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये आग लागली.डेपोमध्ये एक कंत्राटदार हंसा सिटी सीएनजी बस दुरुस्त करत असताना ही घटना घडली. सोशल मीडिया वेबसाइटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये बस डेपोमधील गॅरेजमधून लोक बाहेर पळताना दिसत आहेत. काही लोक आग विझवण्यासाठी अग्निशामक यंत्रांचा वापर करतानाही दिसत आहेत. कर्मचाऱ्यांनी बस डेपोमध्ये पुढील धोका टाळण्यासाठी जळत्या बससमोर उभी असलेली कार हलवली. त्यानंतर अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले.

यासंदर्भात सोशल मीडियावर बसला लागलेल्या आगीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे

संबंधित पोस्ट

कबुतरांना वाचवा, मनःशांतीसाठी एक विशाल धार्मिक बैठक”

गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉलसाठी अर्ज करण्याचे आवाहन

बॉलीवूडचे हसमुख विनोदी अभिनेते सतीश शाह यांचे निधन..

vishwatmaklokswamivarta

पनवेल येथे दुचाकी वाहनांसाठी MH46DH ही नवीन मालिका,पसंतीच्या क्रमांकासाठी अर्ज सादर करावेत

भारतातील १२० कोटींहून अधिक दूरध्वनी ग्राहकांच्या, विशेषतः मोबाइल वापरकर्त्यांच्या डिजिटल सुरक्षिततेसाठी दूरसंचार विभागाने (Department of Telecommunications – DoT) “संचार साथी” हा नागरिक-केंद्रित उपक्रम सुरू

vishwatmaklokswamivarta

विविध योजनांचा लाभ घेण्याचे वसंतराव नाईक विमुक्त व भटक्या जमाती विकास महामंडळाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta