vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचा मुंबई मॅरेथॉन मध्ये यशस्वी सहभाग… 

नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचा मुंबई मॅरेथॉन मध्ये यशस्वी सहभाग…

 

       नवी मुंबई प्रतिनिधी   जगभरातील मॅरेथॉनमध्ये ‘मुंबई मॅरेथॉन’ ही एक मानाची मॅरेथॉन समजली जात असून यामध्ये सहभागी होणे हे अनेक धावपटूंचे स्वप्न असते. मागील 20 वर्षांपासून आयोजित केल्या जाणाऱ्या मुंबई मॅरेथॉनचे 2025 हे द्विदशकपूर्ती वर्ष असून नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांनी यामध्ये सलग दहाव्या वर्षी सहभागी होत 42.195 किलोमीटरचे मुख्य मॅरेथॉनचे अंतर 4 तास 29 मिनिटे 12 सेकंदात यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.

 पहाटे 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून प्रारंभ झालेल्या मुंबई मॅरेथॉनमध्ये 6 मिनिटे 23 सेकंद प्रति किलोमीटर वेगाने धाव घेत डॉ. कैलास शिंदे यांनी मुंबई मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण केली.

    नुकतेच जून महिन्यात त्यांनी जागतिक स्तरावरील मानाच्या दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉन मध्ये 86.6 किलोमीटर अंतर निर्धारित वेळेच्या आधीच 11 तास 10 मिनिटे 56 सेकंदात पूर्ण केले होते.

 अत्यंत महत्त्वाची अशी प्रशासकीय जबाबदारी व व्यस्त दिनक्रम असूनही त्यांनी कधीच धावण्याच्या सरावात खंड पडू दिला नाही. आपले ध्येय निश्चित करून ते पूर्ण करण्याची जिद्द व त्यासाठी अथक परिश्रम आणि सुयोग्य नियोजन या त्रिसूत्रीच्या बळावर धावण्याच्या आवडीतून आरोग्यपूर्ण जीवनाचा मंत्र अंगिकारत आयुक्त डॉ. कैलास शिंदे हे सातत्याने यश मिळवत असून मुंबई मॅरेथॉनमधील या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन आणि प्रशंसा करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट

फार्मर आयडी विना खत वितरण होणार नाही ; शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करावी..

मुंबई विमानसेवा आता दररोज सुरू होणार जळगाव मुंबई 26 तारखेपासून सुरू होणार

vishwatmaklokswamivarta

जात प्रमाणपत्र पडताळणी करून विद्यार्थ्यांनी शैक्षणिक नुकसान टाळावे-मेघराज भाते               

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गतजिल्हा उद्योग केंद्राने गाठले कर्ज मंजुरीच्या 325 प्रस्तावाचे उद्दिष्ट..

vishwatmaklokswamivarta

प्रहारची ‘धार’ अन् प्रशासनाची झाली ‘हार’!धाड येथील आठवडी बाजारासाठी महामार्गावरच थाटली दुकाने; भरचौकात ठोकला उपोषण मंडप

कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशनचा उपक्रम; “डिजिटल शेती शाळा”