vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

सहकार विभागातील तक्रारींच्या निराकरणासाठी सहकार संवाद पोर्टल- जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे

सहकार विभागातील तक्रारींच्या निराकरणासाठी सहकार संवाद पोर्टल- जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे

        सांगली, प्रतिनिधी : महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन लिमिटेडच्या विद्यमाने सहकार संवाद पोर्टल हा उपक्रम सुरू झालेला आहे. सहकार संवाद (https://sahakarsmvadhousingfed.in) हे महाराष्ट्रातील सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील तक्रारींचे निराकरण करण्यासाठी उपलब्ध करून दिलेले संकेतस्थळ आहे. सहकार विभागातील सर्व तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी सहकार संवाद या पोर्टलचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

  सहकार संवाद पोर्टलद्वारे गृहनिर्माण संस्थेचे सदस्य संस्थेच्या कारभारासंबंधीत तक्रारींची नोंद करू शकतात. महाराष्ट्र शासनाच्या सहकार खात्याचे अधिकारी उपनिबंधक आणि सहाय्यक निबंधक हे, या तक्रारींवर कार्यवाही करतील, अशी सुविधा या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तक्रारदारांना आपल्या तक्रारीचे पुढे काय झाले याबाबत संकेतस्थळावर माहिती मिळू शकते. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे आणि त्यांचे अधिनस्त संबंधित अधिकाऱ्यांनाही तक्रार निवारण प्रक्रियेचा आढावा घेण्याची सोय या संकेतस्थळावर केलेली आहे. या ऑनलाइन सुविधेमुळे तक्रारदाराचा संबंधित कार्यालयात जाण्या-येण्याचा वेळ आणि खर्चाची बचत होते. अत्यंत माफक मूल्य आकारून ही सेवा दिली जात आहे. या उपक्रमाला उत्तेजन देऊन त्यासंबंधी सहकार विभागातील सर्व तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी सहकार संवाद या पोर्टलचा वापर करावा, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अंतर्गत जालन्यातील 800 लाभार्थी आयोध्यासाठी रवाना**भाजपा नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांनी दाखवली हिरवी झेंडी*

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची पोलिस पाटील भरती परीक्षा केंद्रास भेट• 24 परिक्षा केंद्रावर 7843 परिक्षार्थींनी दिली पोलिस पाटील भरतीची परीक्षा..

vishwatmaklokswamivarta

पैठण येथे पर्यटन स्थळांना सुविधा तयार कराव्यात : पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

डी.ए.पी. खतास पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन

विदर्भ-मराठवाड्यात ‘दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-2’ सुरु; शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर भर

vishwatmaklokswamivarta

आपले गाव आरोग्य संपन्न करण्यासाठी सर्व यंत्रणांनी पूर्ण क्षमतेने काम करावे -सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर,सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते ‘माझं गाव,आरोग्य संपन्न गाव’ विभागीय कार्यशाळेचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta