vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

भरारी पथकामार्फत कृषी सेवा केंद्राची होणार तपासणी

भरारी पथकामार्फत कृषी सेवा केंद्राची होणार तपासणी

सातारा प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतक-यांना दर्जेदार व गुणवत्ता पुर्ण निविष्ठा पुरवठा होण्याच्या दृष्टीने विविध योजना व अभियानाचे माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. खरीप हंगाम २०२५ अनुषंगाने शेतक-यांची फसवणूक व अतिरिक्त लुट होऊ नये या करिता सातारा जिल्हयामध्ये कृषी विभागामार्फत १२ भरारी पथकामार्फत कृषी सेवा केंद्राची तपासणी करणेत येते, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी दिली आहे.

कृषी निविष्ठा तक्रार निवारण फलकावर शेतक-यांनी आपली तक्रार विविध प्रकारे नोंदविता येवू शकते. ९८२२४४६६५५ या मोबाईल क्रमांकावर व्हॉटसअप व्दारे तक्रार नोंदविता येते. ७४९८९२१२८४ या मोबाईल क्रमांकावर फोन करुन शेतकरी तक्रार नोंदवू शकतात.तसेच क्युआर कोड स्कॅन करुन त्यावर येणारा छोटासा गुगल फॉर्म भरुन शेतक-यांनी तक्रार दाखल करुन घेतली जाणार आहे.

कृषी निविष्ठा केंद्रावर मुख्य निविष्ठेसोबत इतर निविष्ठा खरेदी करिता सक्ती ( लिकिंग ) केल्यास, कृषी निविष्ठा देण्यास टाळाटाळ केल्यास, खरेदीची पावती देण्यास नकार दिल्यास किंवा गुणवत्तेबाबत काही तक्रार असल्यास शेतक-यांनी आपली तक्रार नोंदवावी. शेतक-यांच्यातक्रारीचे निराकरण कृषि विभागामार्फत केले जाणार आहे, असेही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती फरांदे यांनी कळविले आहे

0000

संबंधित पोस्ट

काँग्रेस तर्फे अतिवृष्टी मुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य व केंद्र शासनाने तात्काळ मदत करावी या मागणी करिता गांधी चमन येथे धरणे आंदोलन

vishwatmaklokswamivarta

हिमाचलमध्ये पावसाचा हाहाकार सुरुच, तब्बल 10 ठिकाणी आभाळ फाटल्याने शेकडो घरी वाहून गेली; 5 जणांचा मृत्यू, 11 जणांचा शोध सुरुच, 100 गावांमध्ये बत्ती गुल…

टपाली मतपत्रिकांच्या मोजणी प्रक्रियेत आणखी सुधारणा..

vishwatmaklokswamivarta

ग्रामीण भागात वैद्यकीय उपचारांबाबत जागरूकता वाढवा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा ,जादूटोणा विरोधी कायद्याच्या जनजागृती समितीचा आढावा,बोगस डॉक्टर पकडण्यासाठी धाडसत्र राबविण्याचे निर्देश..

प्रत्येक मुलीने ‘एचपीव्ही’ लसीकरणाचा लाभ घ्यावा : पालकमंत्री जयकुमार रावल जागतिक महिला दिनानिमित्त दोंडाईचा येथे ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीमेचा शुभारंभ

राष्ट्रीय लोक अदालतीत ७ हजार ७८ प्रकरणे निकाली; २०.५५ कोटींची तडजोड