vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

रोहा येथे पंडित दीन दयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

रोहा येथे पंडित दीन दयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

रायगड-अलिबाग,द प्रतिनिधी:-जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,रायगड-अलिबाग आणि एमबी मोरे फॉऊंडेशन धाटाव यांच्या संयुक्त विद्यमाने दि.26 डिसेंबर 2025 रोजी एमबी मोरे फॉऊंडेशनचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, रोहा-कोलाड रोड, एमआयडीसी धाटाव, ता. रोहा येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मागदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीम.अमिता पवार यांनी केले आहे.

जिल्ह्यातील नामांकित आस्थापनांकडील रिक्त पदांच्या/ॲप्रेंटिसशिपची भरतीसाठी रोजगार मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात एस.एस.सी./एच.एस.सी,आय.टी.आय.,डिप्लोमा इंजिनियर, पदवी इंजिनियर, व इतर पदवीधारक नोकरी इच्छूक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. या विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पध्दीतीने अर्ज करता येईल. प्रथम https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरील Employment- Job Seeker (Find A Job)- Job Seeker Login या क्रमाने जाऊन आपल्याकडील युजर आयडी व पासवर्ड वापरुन आपली शैक्षणिक माहीती अद्ययावत करून त्यातील Pandit Dindayal Upadhyay Job Fair या ऑप्शनमधून आपला जिल्हा निवडून जिल्ह्याच्या नावावरील Vacancy Listing-I Agree व दिसणाऱ्या विविध पदाना आपल्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे ऑनलाईन अप्लाय करावे

रोजगार मेळाव्यातील रिक्तपदांची माहिती https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. संकेतस्थळावर ऑनलाईन अप्लाय करताना काही समस्या असल्यास या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02141-222029 व या कार्यालयाचे लिपिक टंकलेखक श्री.म.भा.वखरे,यांच्या 9421613757 या भ्रमध्वनी वर संपर्क साधावा.

 

0000000

संबंधित पोस्ट

जनगणना प्रक्रिया समजावून घेण्यासाठीप्रशिक्षण महत्त्वाचे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

तळा नगरपंचायतीची प्रशासकीय इमारत शहराच्या वैभवात भर घालणारी ठरेल    — उपमुख्यमंत्री अजित पवार

राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारी ‘युनिटी पदयात्रा’ उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकला जोडणाऱ्या महामार्गाबाबत बैठक

नाशिक-सूरत महामार्गावर भीषण अपघात, बस 200 फूट दरीत कोसळली, ७ जण जागीच ठार, १५ जणांची प्रकृती गंभीर

vishwatmaklokswamivarta

श्रावण यात्रा काळात खाद्यपदार्थांच्या तपासणी करावी   – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे निर्देश शाळेतील व परिसरातील अन्नपदार्थांची नियमित तपासणी करा श्रावण महिन्यात उपवासाचे पदार्थ विक्री करताना अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करा