vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

रोहणा येथे सिकलसेल व कुष्ठरोग ‘स्पर्श’ अभियानांतर्गत जनजागृती 🔴

रोहणा येथे सिकलसेल व कुष्ठरोग ‘स्पर्श’ अभियानांतर्गत जनजागृती 🔴

 

बुलढाणा, प्रतिनिधी-जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या “अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान” तसेच ‘कुसुम – कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (स्पर्श)’ अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, रोहणा येथे नागरिकांची तपासणी, समुपदेशन व व्यापक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

👩‍⚕️ वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहासिनी शिरोडकर यांनी सिकलसेल तपासणीचे महत्त्व विशद करत कुष्ठरोगाबाबत समाजातील गैरसमज दूर केले व ‘स्पर्श’ अभियानाची उद्दिष्टे स्पष्ट केली.

📢 जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी धुताडमल यांनी ० ते ४० वर्षे वयोगटातील सर्व स्त्री-पुरुषांनी, विशेषतः विवाहपूर्व सिकलसेल तपासणी करून घेण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमास आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

💙 आरोग्यदायी समाजासाठी तपासणी आवश्यक – आजच तपासणी करा!

संबंधित पोस्ट

ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करुन आयुष्मान कार्ड मंजूर होण्यापर्यंतचा बहुमूल्य वेळ वाचविता यावा यासाठी नागरिकांनी आयुष्मान कार्ड तयार करुन घ्यावे, असे आवाहन करण्यात आलेआहे

क्षयरुग्णांना पोषक आहार वाटप-निक्षय मित्र महानगर गॅस कंपनीचा सामाजिक पुढाकार

vishwatmaklokswamivarta

कॅन्सर रजिस्ट्री सुरू करणारी पहिली महानगरपालिका असल्याबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेची आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून प्रशंसा…

vishwatmaklokswamivarta

सामाजिक सप्ताहानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

माझे गाव, आरोग्य संपन्न गाव अभियान बुलढाण्यात आरोग्य सेवांचा घेतला आढावा; अभियान प्रभावी राबविण्याच्या सूचना

रायगड जिल्हा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि स्वदेस फाउंडेशन यांच्यातसात तालुक्यामध्ये आरोग्य सुधारण्यासाठी सामंजस्य करार