vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी

गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी

पुणे प्रतिनिधी-महाराष्ट्र गोसेवा आयोगामार्फत गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) शेखर मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली आयोगाच्या कामकाजाला विशेष गती प्राप्त झाली आहे.

राज्यातील ६५० हून अधिक गोशाळांना भेटी देऊन तसेच १००० पेक्षा अधिक गोपालक, शेतकरी व संबंधित संस्थांशी संवाद साधत विविध प्रश्नांच्या निराकरणासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. सन २०२५-२६ या वर्षासाठी देशी गाईंच्या संगोपनासाठी प्रती गाय प्रतिदिन ५० रुपये अनुदान योजना सुरू करण्यात आली असून, या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कार्यान्वित करण्यात आली आहे.

‘सेव्ह द काऊ’ उपक्रमांतर्गत ५,५०० हून अधिक गाईंचे संरक्षण करण्यात आले आहे. तसेच सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर गोमयापासून तयार करण्यात येणारे दिवे, मूर्ती, साबण यांसारख्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देत ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे कार्य करण्यात येत आहे.

याशिवाय, गोमय उत्पादने, ई-गोकट्टा उपक्रम, अधिकृत संकेतस्थळ यांसारख्या माध्यमांतून गोसंरक्षणासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यात येत असून आयोगाचे कामकाज अधिक पारदर्शक व गतिमान करण्यात आले आहे. राज्यातील गोवंश संरक्षणासाठी आयोग कटिबद्ध असल्याचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी सांगितले.

0000

संबंधित पोस्ट

इतर मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी विविध योजना; अर्ज सादर करण्याचे आवाहन

थकीत कर्जाचा एक रकमी भरणा केल्यास व्याजात मिळणार 50 टक्के सवलत

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यातील सर्व उद्योजकांनी-फ्लॅटेड गाळा भाडे सवलत योजनेचा लाभ घ्यावा

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्याचा जीडीपी २०२७-२८ पर्यंत तीन लाख कोटींवर नेण्याचा संकल्प – जिल्हाधिकारी किशन जावळे

ठाणे जिल्ह्यात M-Sand धोरणाच्या अंमलबजावणी व प्रसिद्धीबाबतऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन

टाटा सन्स उद्योग समूहानं एन. चंद्रशेखरन यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी फेरनियुक्ती करण्याचा निर्णय ..

vishwatmaklokswamivarta