vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ अंतर्गतमहिला शेतकरी गटांसाठी कृषी अवजारे बँक स्थापनेची संधी ५ एप्रिलपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करा

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ अंतर्गतमहिला शेतकरी गटांसाठी कृषी अवजारे बँक स्थापनेची संधी ५ एप्रिलपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करा

लातूर, प्रतिनिधी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (टप्पा-२) अंतर्गत ग्रामीण भागात शेतकऱ्यांना आधुनिक कृषी यंत्रसामग्री भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्यासाठी “एक गाव, एक कृषी अवजारे बँक” या तत्त्वावर महिला शेतकरी गटांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत नोंदणीकृत महिला स्वयंसहाय्यता गट, उमेद महिला गट किंवा महिला ग्राम संघ यांना गावस्तरावर कृषी अवजारे बँक स्थापन करण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा यंत्रसामग्रीवर होणारा खर्च कमी होईल आणि शेती उत्पादकता वाढेल. निवड झालेल्या महिला गटाला कमाल ४० लाख रुपयांपर्यंत लाभ मिळू शकतो. फार्मर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या महिला शेतकरी गटांना या योजनेअंतर्गत प्राधान्य देण्यात येईल. तरी इच्छुक महिला गटांनी https://dbt-ndksp-agribusiness.mahapocra.gov.in/ या अधिकृत पोर्टलवर जाऊन ५ एप्रिल २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून, प्रत्येक गावातील पात्र गटांची निवड पारदर्शक पद्धतीने केली जाईल. लातूर जिल्ह्यातील महिला गटांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प संचालक दिलीप जाधव यांनी केले आहे.

 

****

संबंधित पोस्ट

नांदेड जिल्ह्यात ‘ #महाभूसंपादनपोर्टल ’चा #शुभारंभ‘महाभूसंपादन पोर्टल’मधून #ऑनलाईन पद्धतीने होणार #भूसंपादन प्रक्रिया

जिल्ह्यातील पशुपालकांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त सरदार 150 एकता अभियान· विविध उपक्रमाचे आयोजन· ‘माय भारत’ पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे झालेल्या अभूतपूर्व नुकसानीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी ३१ हजार ६२८ कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची घोषणा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या हस्ते जेएन पोर्ट-पीएसए मुंबई टर्मिनल (बीएमसीटी) फेज-२ चे हैद्राबाद हाऊस, नवी दिल्ली येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत; रविवारी (दि.२३) परीक्षा