vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

कर्नाटकमध्ये  पहाटे झालेल्या भीषण रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला, अनेक जण गंभीर जखमी 

कर्नाटकमध्ये  पहाटे झालेल्या भीषण रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला, अनेक जण गंभीर जखमी

 

राज्य प्रतिनिधी-

कर्नाटकमध्ये उत्तरा कन्नडच्या अरेबिले येथे बुधवारी पहाटे झालेल्या भीषण रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला, तर 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात एका ट्रकला झालेल्या दुर्घटनेमुळे घडला असून, ट्रकमध्ये अनेक मजूर प्रवास करत होते. सावनूरहून कुमठा मार्केटमध्ये भाजी विकण्यासाठी अपघातग्रस्त ट्रक जात असताना ट्रकचा भीषण अपघात

याबाबतची माहिती अशी की. सावनूरहून कुमठा मार्केटमध्ये भाजी विकण्यासाठी अपघातग्रस्त ट्रक जात असताना ट्रकचा भीषण अपघात झाला. अपघातग्रस्त ट्रक जड मालवाहतुकीसाठी वापरण्यात येत होता, परंतु त्यामध्ये मजूर देखील प्रवास करत होते. अपघात एवढा भीषण होता की, घटनास्थळीच अनेक जणांचा मृत्यू झाला, तर इतर जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. स्थानिक प्रशासन आणि पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य सुरू असून, जखमींना वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले आहे

 

संबंधित पोस्ट

राज्याच्या जलधी क्षेत्रात नियंत्रण ठेवण्यासाठी आता ड्रोनचा वापर- राज्यातील 07 सागरी जिल्ह्यातील 09 ठिकाणी पहिल्या ड्रोन प्रणालीचे उड्डाण..

vishwatmaklokswamivarta

नटराज व विश्वकर्मा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदभरतीसाठी1 ते 8 जुलै कालावधीत ऑनलाईन परीक्षा..

रायगड आणि आसपासच्या भागांसाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी …

vishwatmaklokswamivarta

जालना शहरात नारी शक्ती वंदन या कायद्यास भव्य रॅली काढून समर्थन

शिवराज्याभिषेक सोहळ्याचे काटेकोरपणे नियोजन करा- जिल्हाधिकारी किशन जावळे*